‘रस्ता द्या रस्ता” : पांदन रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन

0
111

भद्रावती – शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना पांदन रस्ता आहे.मात्र पावसाळ्यात शेतात जायचे असल्यास, मशागतीसाठी ट्रॅक्टर ,बैलजोडी न्यावयाची म्हंटली तर अनेक अडचणींना सामना करावा लागतो. अशातच एखाद्या शेतकऱ्याची पेरणी झाली असल्यास तो आपल्या शेतातून जाऊ देण्यास मज्जाव करतो.आणि शेतकऱ्यांची चिंता वाढते. हा प्रकार अनेक गावात शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसून येतो.
वडाळा रिट येथील अनेक शेतकऱ्यांचा असलेला पांदन रस्ता एका शेतकऱ्याने कुंपण टाकल्याने बंद झाला आहे.गट क्र.११०/२ व इतर गट क्र.च्या शेतकऱ्यांना त्यामुळे आपल्या शेतात जायचे कुठून हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पंचवीस-तीस शेतकऱ्यांनी मिळून तहसीलदार भद्रावती यांना शेतात जाणारा पांदन रस्ता तयार करून शेतात जाण्याची अडचण कायमस्वरूपी सोडवावी या आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार भद्रावती यांना प्रगतिशील शेतकरी डॉ. विशाल शिंदे व इतर शेतकरी यांनी दिले आहे.
हा पांदन रस्ता तयार करून आम्हा शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा व आम्हा सर्व शेतकऱ्यांची शेतात जाण्याची कायमस्वरूपी अडचण दूर करावी असे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here