एक रुपयाच्या गुंतवणुकीतून वर्षभरात शंभर रुपये करण्याची ताकद ठेवा – न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम

0
140

 

भद्रावती:-
जगामध्ये अशी कोणती मशीन आहे की, ती एक रुपयाच्या गुंतवणुकीत वर्षभरात शंभर रुपये बनविते.ते दुसरे काहीही नसून एक रुपया किमतीचे मासोळीचे एक बोटूकली मत्स्यबीज आहे जे की वर्षभरात १ किलो वजनाचे होऊन १०० रुपयांचे बनते असे सत्काराला उत्तर देतांना मेश्राम म्हणाले .
तसेच मत्स्यव्यवसायकांनी तलावात १ लाख मत्स्यबीज सोडल्यास कोट्यवधीची माया जमविल्याशिवाय राहणार नाही. यामुळेच समाज प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त सदस्य माजी न्यायमूर्ती व मच्छीमार भोई समाजाचे वरीष्ठ नेते चंद्रलाल मेश्राम यांनी व्यक्त केले .ते स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था व टायगर ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.
समाजातील लोकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण द्या ,सरकारने शिक्षणासाठी विविध उपाययोजना काढल्या आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या, कुण्या दुसऱ्यांवर विसंबून राहू नका,सोबतच जातीवर मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घ्या,जेणेकरून आपली व समाजाची प्रगती होईल.मागासवर्गीय आयोगाचे माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय समाजासाठी मला जे करता येईल त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करेल. असेही यावेळी बोलतांना म्हणाले.यावेळी त्यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.हा सत्कार सोहळा दि.१९ जूनला स्थानिक बालाजी सभागृहात घेण्यात आला.याप्रसंगी विदर्भ भोई समाज आघाडीच्या रंजना पारशिवे,संस्थेचे अध्यक्ष रविंद्र नागपुरे,नगरसेविका शीतल गेडाम,माजी अध्यक्ष दिलीप मांढरे, भारत नागपुरे,भोई समाज तालुका अध्यक्ष सुनिल पारशिवे,उमाताई नागपुरे,अंजना पढाल,माधुरी गेडाम,मनोहर नागपुरे, सुनिल पढाल,अनंता मांढरे, आशिष कार्लेकर,संभाजी मांढरे,टायगर ग्रुपचे रुपेश मांढरे,विनोद नागपुरे, गोरख कामतवारआदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here