महिलांनी केले १०८ सुर्यनमस्‍कार

0
52

मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनानुसार भाजपा महिला मोर्चाच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा व पंताजली योग समितीच्‍या सौ. स्मिता रेभनकर यांच्‍या उपस्थित दिनांक २० जुन २०२१ ला सकाळी ५.३० ते ६.३० वा. पर्यंत ठक्‍कर कॉलनी, पठाणपुरा येथील खुल्‍या मैदानात महिलांद्वारे १०८ सुर्यनमस्‍कार करण्‍याचा कार्यक्रम आंतरराष्‍ट्रीय योग दिनाच्‍या निमित्‍ताने घेण्‍यात आला. यावेळी पंताजली योग समिती च्‍या माध्‍यमातुन ठक्‍कर कॉलनीतील महिलांनी उस्‍त्‍फुर्त सहभाग दर्शविला. यावेळी श्री. साधनकर काका, श्री. पाठकभाई, श्री. रमेश कासुलकर, श्री. सुनिल तायडे, सौ. ज्‍योतीताई मसराम, सौ. सपना नामपल्‍लीवार, सौ. छाया मॅकलवार, सौ. अपर्णा चिडे, नसरिन शेख, दोशल चिडे, सौ. वंदना संतोषवार, सौ. प्रतिभा रोकडे, कु. सोनबर शेख, सौ. वाणीराव यांची उपस्थिती होती. तसेच भाजपा महिला मोर्चाच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर व महामंत्री शिलाताई चव्‍हाण यांच्‍या अध्‍यक्षतेत भाजपा कार्यालय येथे २१ जुन ते २७ जुन पर्यंत घेण्‍यात येणा-या कार्यक्रमाच्‍या नियोजनाकरीता बैठक घेण्‍यात आली. त्‍यामध्‍ये २१ जुन ला प्रत्‍येक मंडला मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त योग साधना, २३ जुनला डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्‍मृती दिनानिमित्‍त प्रत्‍येक शक्‍तीकेंद्राच्‍या माध्‍यमातुन श्रध्‍दांजली अर्पण करण्‍याचा कार्यक्रम, २५ जुन ला राष्‍ट्रीय आणीबाणी दिवस ‘काळा दिवस’ निमित्‍य त्‍या काळात जे मिसा मध्‍ये अटकेमध्‍ये होते त्‍यांचा सत्‍कार कार्यक्रम, २६ जुन ला चक्‍का जाम आंदोलन, २७ जुन ला प्रत्‍येक प्रभागामध्‍ये मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्‍या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करणे अशा अनेक विषयांवर चर्चा करुन कार्यक्रमाचे नियोजन करण्‍यात आले.

यावेळी सौ. अंजली घोटेकर, सौ. शिलाताई चव्‍हाण, सौ. विशाखा राजुरकर, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. प्रभा गुडधे, सुष्‍मा नागोसे, सौ. रेणुताई घोडेस्‍वार, सौ. वंदना संतोषवार, कु. मोनिषा महातव, सौ. पुनम गरडवा, सौ. लता तुम्‍मे, सौ. ज्‍योती दिंगलवार, सौ. शुभांगी दिकोंडवार, सौ. अनिता झाडे, सौ. शमा काझी इत्‍यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here