खासदार बाळु धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कॅन्सर रुग्णाला आर्थिक मदद घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी दिला मददतीचा हात

0
134

खासदार बाळु धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कॅन्सर रुग्णाला आर्थिक मदद

घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी
यांनी दिला मददतीचा हात

घुग्घुस : महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रातील एकमेव लोकप्रिय खासदार बाळु भाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे वॉर्ड क्रं 03 येथे राहणाऱ्या मारोती शिवरकर यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदद व अनाजकीट मदद स्वरूपात दिली.

चाळीस वर्षीय मारोती शिवरकर हे हात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते कोरोनामूळे आधीच बेरोजगारी सहन करीत असणाऱ्या शिवरकर यांना कर्करोगाची लागण झाली घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीला कर्करोग झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ही बाब रेड्डी यांच्या लक्षात येताच त्यांनी शिवरकर कुटूंबियांना आर्थिक मददतीसह अनाजकिट देऊन त्यांना मदडतीचा हात दिला तसेच त्यांच्या उपचारासाठी सर्वोत्तपरी मदद देण्याचे ही मानस व्यक्त केले.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, अजय उपाध्ये, सिनू गुडला, रमेश रुद्रारप, शफी भाई, सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here