200 युनिट विज मोफत द्या – यंग चांदा ब्रिगेडचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन

121

चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत द्या, या मागणी करीता यंग चांदा ब्रिगेडचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन

  चंद्रपूर जिल्ह्याला विज उत्पादक जिल्हा म्हणून विशेष दर्जा देत येथील नागरिकांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी या मागणी करीता आज यंग चांदा ब्रिगेडच्या शिष्ट मंडळाने उर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली असून त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, अमोल शेंडे,  करणसिंह बैस, राशिद हूसेन, विश्वजित शाहा, हरमन जोसेफ, जितेश कुळमेथे, अजय दुर्गे,  सलिम शेख, दिनेश इंगडे, आनंद इंगडे, रुपेश पांडे, वर्मा आदिंची उपस्थिती होती.

    चंद्रपूर जिल्हा हा विज उत्पादक जिल्हा आहे. येथे जवळपास 5 हजार मेगावॅट इतकी विज तयार केली जाते. याचे दुष्पपरिणामही प्रदुषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकर सोसत आहे. त्यामूळे याचा मोबदला म्हणून चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. या मागणीसाठी त्यांचा वेळोवेळी पाठपूरावाही सुरु आहे. दरम्याण आज राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत हे चंद्रपूर जिल्हाच्या दौ-यावर असतांना  सिएसटीपीएस येथील विश्रामगृहात यंग चांदा ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली असून सदर मागणीचे निवेदन दिले आहे. चंद्रपुरात जगातील सर्वात प्रदूषित समजल्या जाणारे थर्मल पाॅवर स्टेशन आहे. येथे कोळस्यापासून विज निर्मीती केली जाते.  या केंद्रातून होणा-या प्रदुषणामूळे विविध आजारांची लागण होत असून चंद्रपूरकरांचे आयुष्यमान 5 ते 10 वर्षानी कमी झाले आहे. असे तज्ञांचे म्हणने आहे. असे असतांनाही दोन ते अडिच रुपये प्रति युनिट तयार होणारी विज चंद्रपूरकरांना 4 ते 12 रुपये प्रतियुनिटच्या भावात खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे हा अन्याय असल्याचे सदर निवेदनात म्हणण्यात आले असून चंद्रपूर जिल्हाला विज उत्पादक जिल्हाच्या विशेष दर्जा देत येथील नागरिकांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.