सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा – आ. किशोर जोरगेवार

0
83
  1. सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा – आ. किशोर जोरगेवार
    पोलिस अधिक्षकांची भेट घेत केल्या सुचनासोशल मिडियाच्या माध्यमातून तरुन मुला मुलींशी मैत्री करत त्यांची फसवणूक करुन खंडणी वसुल करणा-यांची टोळी सध्या चंद्रपूरात सक्रिय झाली असून अशा अनेक तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या आहे. दरम्यान काल शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेतली असून सोशल मिडियाच्या माध्यमातून घडणारे फसवणूकीचे प्रकार थांबविण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी अशा सुचना पोलिस अधिक्षक यांना केल्या आहे.
सोशल मिडीयाचा विस्तार होताच त्याचे फायदे आणि नुकसान दिसू लागले आहे. अनेक सायबर गुन्हेगारांनी आता याचा माध्यमांचा वापर करत सर्वसामान्यांची फसवणूक करायला सुरुवात केली आहे. अश्या अनेक तक्रारीही पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्यातच आता काही विकृत स्वभावाचे गुन्हेगार  सोशल मिडियाच्या माध्यमातून चंद्रपुरातील तरुण मुला-मुलींसोबत मैत्रीचे नाटक करून आपल्या शब्दांच्या जाळ्यात त्यांना गुंतवत आहे. नंतर प्रेमाचे खोटे नाटक करून त्यांचे व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे फोटो मागवत या  फोटोंना एडिटिंग आणि क्रॉप करून अश्लील चाळे करतांनाचे बनावटी  इमेजेस तयार करत आहे. नंतर या बनावटी फोटोच्या आधारे सदर व्यक्तीला  धमक्या दिल्या जात असून त्यांच्याकडून पैसे मागीतले जात आहे.  बनावट फोटोंचा वापर करून तरुणांकडून आधी हजार रुपया पासून खंडणी गोळा केली जात आहे. नंतर  हळूहळू  लाखो रुपयांची मागणी केल्या जात आहे. अशा प्रकरणात बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली जात नसल्याचा फायदा हे गुन्हेगार घेत आहे. अशा प्रकरणाबाबत काही पालकांनी आमदार किशोर जोरगेवार यांना माहिती दिली आहे. त्यांनतर आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेत सायबर सेलच्या माध्यमातून अशा टोळींवर लक्ष ठेवून वेळीच कार्यवाही करण्यात यावी तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडणारे फसवणूकीचे गुन्हे थांबविण्यासाठी पोलिस विभागाच्या सायबर सेलने मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षकांना केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here