बल्लारपूरच्या बदला प्रकरणातून चंद्रपुरात थरार ! दोन आरोपी अटकेत

0
713

बल्लारपूरच्या बदला प्रकरणातून चंद्रपुरात थरार !

दोन आरोपी अटकेत

चंद्रपुर : बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरीया यांची वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आठ आगस्टला भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वर्चस्वाच्या वादातून घडलेले हे टोळीयुद्ध पुनश्च एकदा सक्रिय झाल्याचे कालच्या घटणेंने उघड झाले आहेत.

सोमवारी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात आकाश उर्फ चिन्ना अंदेवार या युवकावर बुरखाधारी युवकाने अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आकाश हा गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना काळ सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाळे यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथून दोन युवकांना रात्रीच्या सुमारास अटक केली आहे. अंकुश वर्मा, अमित सोनकर अशी अटकेतील युवकांची नावे आहेत. विशेष म्हणजे, अटकेतील दोन्ही युवक सुरज बहुरिया टोळीचे सदस्य असल्याची प्राथमिक माहीती आहे.
काही महिन्यांपूर्वी बल्लारपूर येथे सुरज बहुरिया याच्यावर बल्लारपुर भागातील बामणी परिसरात आपल्या चारचाकी वाहनात असताना त्याचेवर गैंगवार मधून गोळीबार करण्यात आला होता. त्यात सुरज बहुरिया याचा मृत्यू झाला. या प्रकरणात तब्बल १० युवकांना ताब्यात घेतले होते. यातील ५ युवकांना दोन महिन्यांपूर्वी जामीन मिळाला होता. त्यात कालच्या गोळीबारात जखमी झालेल्या आकाश चा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here