अंदेवार गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपीला अटक

821

चंद्रपुर (प्रतिनिधी) :
चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात आकाश उर्फ चिन्ना अंदेवार या युवकावर बुरखाधारी युवकाने अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आकाश हा गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.हेती त्यानंतर पोलिसांना बल्लारपूर येथून अंकुश वर्मा अमित सोनकर या दोन युवकांना अटक केली होती. आता या प्रकरनात बुरखा घालुन बेछुट गोळीबार करना-या चंद्रेश उर्फ छोटु सुर्यवंशी या मुख्य आरोपीला बल्लापूर येथुन शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा कडुन गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल जप्त करण्यात आली आहे तिनही आरोपी पोलिस कोठडीत असुन शहर पोलीस अधिक तपास करीत आहे.