वर्धा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी : धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प

0
1346

वर्धा नदीच्या पुलावरून पाणी ओसांडून वाहू लागल्याने धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प

आज शुक्रवार 23 जुलै रोजी घुग्घुस-गडचांदूर मार्गावरील धानोरा येथील वर्धा नदीला पुर आल्याने पुलावरून पाणी चार फुटाच्या वरून ओसांडून वाहू लागल्याने हा रस्ता बंद झाला आहे.
गडचांदूर येथे अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट अश्या मोठया सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहे. नागपूर मार्गे धानोरा फाटा ते गडचांदूर या मार्गाने सिमेंट वाहतूक करणारे मोठे बल्कर टँकर व ट्रक जाने येणे करतात परंतु हा मार्ग ठप्प झाल्याने या मार्गाची वाहतूकही ठप्प झाली आहे.

धानोरा-गडचांदूर मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी ओसांडून वाहू लागल्याने जवळील धानोरा, पिपरी अश्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

काल गुरवार रात्री पासून हा रस्ता बंद होण्याच्या मार्गांवर होता. मागील तीन दिवसा पासून घुग्घुस शहरात पावसाने दमदार हजेरी लावली.
बुधवार 21 जुलै ते 23 जुलै या तीन दिवसापासून घुग्घुस शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. विजेच्या कडाक्यासह सततधार पाऊस पडला. आज सकाळ पासून मुसळधार पाऊस पडल्याने रस्ते जलमय झाले असून नाल्या तुडुंब भरल्या आहे परिसतील शेतात हि पाणी साचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here