*सेवा, सहयोग, सहृदयता म्हणजे आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार :-जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर

0
162

*सेवा, सहयोग, सहृदयता म्हणजे च आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार :-जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर* 🙏*भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित गंजवार्डात नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न*

*भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर महानगर च्या वतीने मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह घेण्यात आला, त्या अनुषंगाने आज दि. 7 ऑगस्ट, 2021 रोजी गंजवार्ड येथे आज भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगराचे जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे व भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात व यश बांगडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला*.
शिबिरामध्ये 835 लोकांच्या नेत्रांची तपासणी करण्यात आली व 560 लोकांना चष्म्याचा नंबर लागला आहे तरी या लोकांना 7 दिवसाच्या आत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये गंजवार्ड व युवक गणेश मंडळातील ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यात संतोष बांगडे, दीपक गवाल्पंछी, प्रवीण विटेकर, अजय बच्चुवार, सुधीर माजरे, विशाल गवाल्पंछी, संजय गवाल्पंछी, अक्षय घुबडे, राजकुमार पाचभाई यांचा समावेश होता. कोरोना योद्धा तारिका विटेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
शिबिराचे उदघाटन भाजपा, चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भारतीय जनता युवा मोर्चा , चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महिला मोर्चा, चंद्रपूर महानगच्या जिल्हाध्यक्ष अंजलीताई घोटेकर, चंद्रपूर महानगरपालिके च्या महापौर राखीताई कंचर्लावर, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती रवी आस्वनी, भाजपा बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवर, भाजयुमो बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारने, झोन क्र. 1 च्या नवनियुक्त सभापती छबुताई वैरागडे, नगरसेविका आशा ताई आबोजवर, शीतल ताई कुळमेथे,भाजयुमो महामंत्री प्रमोद क्षीरसागर, सुनील डोंगरे, प्रज्वलंत कडू, भाजपा युमो उपाध्यक्ष सागर हांडे, राजेश यादवं, कुणाल गुंडावार, राहुल पालं, स्नेहींत लांजेवार, मनीष पीपरे, मंडळ अध्यक्ष युवा मोर्चा संजय पटले, उपाध्यक्ष सुरज पेद्दुलवार उपस्थित होते. शिबिराची सांगता महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी केली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौरभ वासेकर, शुभम बांगडे, स्नेहीत लांजेवार, कुणाल गुंडावर, संजय पटले यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन सौरभ वासेकर व आभार प्रदर्शन शुभम बांगडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here