ओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक दया.

0
114

ओबीसीची स्वतंत्र नोंद करा आणि लोकसंख्येनुसार ओबीसीना त्यांचा संवैधानिक वाटा द्या, असा सूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सहाव्या अधिवेशनात उमटला. ७ ऑगस्ट या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापना दिवसांचे औचित्य साधून ओबीसी दिवस व मंडल दिवस म्हणून हे ऑनलाईन अधिवेशन पार पडले.
अधिवेशनाचे ऑनलाईन उदघाटन आंध्रप्रदेशचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.ईश्वरया यांनी केले. अधिवेशनाचे समन्वयक म्हणून अमेरिकेवरुन डाॅ हरी इपन्नापल्ली यांनी कामकाज साभांळले.गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ बबनराव तायवाडे,.आ.डाॅ. नारायण मुंडे यांनी भारतात पाहिले मंडल स्तंभ उभे करणारे यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डाॅ अशोक जिवतोडे,इंडिया टुडे चे दिलीप मंडल, राजस्थान चे अँड एन,टी.राठोड, तामिळनाडूचे जी.करुणानिधी, राष्ट्रीय महासचिव सचिन राजुरकर, हंसराज जांगिड, डॉ खुशाल बोपचे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनदीप राणा,राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, महाराष्ट्र प्रशाध्यक्ष प्रकाश भागरथ , कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शाम लेडे,पंजाबचे प्रजापती संघटनेचे जसपाल सिंग खिवा,तेलंगाणाचे श्रीनिवास जाजूला,तेलंगणा राष्ट्रिय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीनारायण, गोव्याचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष मधु नाईक, युवा प्रदेशाध्य चेतन शिंदे, महिला अध्यक्ष कल्पना मानकर, सुषमा भड, रेखा बारहाते आदिचा सहभाग होता.
न्या.व्ही. ईश्वरया म्हणाले, सरकारने ओबीसीची मागणी योग्यपणे समजून घ्यावी. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया करु नये. सर्व राज्य सरकारनी आणि केंद्राने एकञ बसुन लवकरात लवकर धोरण ठरवावे.
डॉ बबनराव तायवाडे यांनी प्रस्तावित भूमिका मानताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संघर्षाचा प्रवास मांडला. ओबीसीची जातनिहाय स्वतंत्र जनगणना व्हावी,त्या निकषानुसार आरक्षण मिळावे, केंद्रात ओबीसी कल्याण मंञालय स्थापन व्हावे, अशी मागणी केली.इंडिया टुडे चे दिलीप मंडल यांनी जनगणना झाल्यास काय फायदा होणार यांच्यावर प्रकाश टाकला, देशभरातून आणि राज्य राज्यातून लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ अशोक जिवतोडे यांनी मंडल आयोग अहवाल २० वर्षानंतरही लागू न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.नारायण मुंडे यांनी जानेवारी पर्यंत ओबीसीचे हक्क न मिळाल्यास सरकार सोबत असहकाराचे आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. जसपाल सिंग खिवा पंजाब यांनीही मोठे आंदोलन उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली. सचिन राजुरकर यांनी लीड इंडिया फाऊंडेशनचे आभार व्यक्त करुन अधिवेशन यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली सर्वांचे आभार मानले या सोबतच अन्य वक्त्याचीही भाषणे झाली.वेबिनार मध्ये जगातील ओबीसी बांधवानी लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here