जिवती येथे जागतिक मुलनिवासी दिन उत्साहात साजरा

0
145

 

जिवती फारुख शेख
तालुका प्रतिनिधी :
जिवती शहरात मुलनिवासी एकता संघर्ष समिती जिवती च्या वतीने जागतिक मुलनिवासी दिन महोत्सव साजरा करण्यात आले.
याप्रसंगी बाबुराव शेडमाके चौक व बिरसा मुंडा याठिकाणी सप्तरंगी ध्वज करून महापुरुष प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गोदरू पाटील जुमनाके यांच्या प्रांगणात समाजजागृती मार्गदर्शन करण्यात आले.
स्व. गोदरू पाटील जुमनाके यांचा आवारात “सेवा सेवा, जय सेवा…..जय गोंडवाना ..आदिवासी समाजाचे थोर पुरुष, क्रांतिकारक जय सेवा करत..! अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. आदिवासी महिला आणि पुरुषांनी पारंपरिक पद्धतीने चिमुकल्या लहान मुलांनी नृत्य सादर करून आपला जल्लोष व्यक्त केला त्याच बरोबर सामूहिक नृत्याच्या माध्यमातून आपल्या रूढी आणि पद्धतीचे दर्शन घडवले.
शिक्षणातून नव्या पिढीची कल्याण होते. हे स्पर्धचे युग आहे आता त्यासाठी गावागावात शैक्षणिक वातावरण निर्माण करा.तसेच नव्या पिढीने शिक्षणासोबत समाजाची संस्कृती जोपासण्याची गरज आहे असे प्रतिपादन गजानन पाटील जुमनाके यांनी कले.
मुळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती च्या वतीने ९ आॅगस्ट जागतिक मुळनिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.उद्घाटक जेष्ठ नेते भिमराव पाटील मडावी मा.जि.प.सदस्य चंद्रपूर यांनी केले.
याप्रसंगी भिमराव मेश्राम मा.सभापती,पांडुरंग जाधव संचालक जि.म.बँक चंद्रपूर ,पुष्पा नैताम माजी नगराध्यक्षा,सतलाबाई जुमनाके माजी सदस्या जि.प.चंद्रपुर,सत्तरशाह कोटनाके माजी सरपंच, शामराव गेडाम,सुकलाल कोटनाके, सोनेराव पेन्दोर माजी सरपंच, हनमंतू कुमरे माजी सरपंच,कर्णु पा.धूर्वे,भिमराव सिडाम,डॉ.डुडूले,प्रा.प्रकाश वट्टी, मा.सरपंच,भिमराव पाटील जुमनाके, रमेश कोटनाके, गोविंदराव कृमरे, मानिकराव कन्नाके,बाजीराव वलका,कौशल्याबाई गेडाम, आनंदराव शेडमाके,झाडु कोडापे सरपंच, प्रभाकर उईके, शिवाजी नैताम यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ.डुडूले यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.तर मध्यवर्ती बँकचे संचालक पांडुरंग जाधव यांनी आदिवासी समाजात एकता ठेवून शिक्षणाकडे वळले पाहीजे शिक्षणाबरोबरच स्वंताची संस्कृती जपवणूक केली पाहिजे असे व्यक्त केले.
आता ती परिस्थिती बदलण्यासाठी समाजाला शिक्षित व संघटित होण्याची गरज आहे असे प्रतिपादन भिमराव पाटील मडावी यांनी केले. यावेळी तालुक्यातील गावागावात आदिवासी समाजातर्फे रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिगोराव सोयाम यांनी केले.स्वागतोत्सुक समितीचे सहसचिव कंटू कोटनाके,व संचालन समितीचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मण मंगाम तर आभार सचिव सिताराम मडावी यांनी मानले.
आयोजन करिता फारुख शेख पाटण,सोमजी सिडाम, नामदेव जुमनाके, केशव कुमरे, संजू मडावी,संदीप मेश्राम, मोहन आत्राम,सागर कोटनाके, जंगु वेट्टी,कविता सोयाम, शुभांगी वेट्टी,इंदिरा मेश्राम, चैनराव मडावी, गंगु पा.गेडाम,क्रिष्णा सिडाम, केशव कोहचाळे,अनिल येरमे, जपत वेट्टी, गोविंदा कोटनाके, वाघूजी ऊईके,अर्चना वेट्टी, लक्ष्मीबाई जुमनाके, शंकर गेडाम, रवि कन्नाके व आदिवासी कार्यकर्ते, समितीचे पदाधिकारी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here