अपघातात मृत्यू पावलेले वृत्तपत्र विक्रेते राहुल पोहरे यांच्या परिवारास आर्थिक मदत

0
152

यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्था द्वारा अपघातात मृत्यू पावलेले सदस्य राहुल पोहरे यांच्या परिवारास आर्थिक मदत प्रदान
यवतमाळ – यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संस्थेचे सदस्य स्व. राहुल दिलीप पोहरे यवतमाळ यांचे जुन 21 मध्ये देवळी येथे झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यांच्या परिवारास संस्थेमार्फत रोख 13.000 रूपये व मुलांना खाऊचे वितरण दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी घरी त्यांच्या पत्नी श्रीमती स्मिता राहुल  पोहरे, वडील दिलीप पोहरे, चि. आरूष, कु. रूतिका यांच्या सुपूर्द करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे, संतोष शिरभाते, राहुल वानखडे, श्रीपाद तोटे, किरण कोरडे, प्रमोद मांडळे, कमलनयन कोठारी, रवि बावणे, सतिश बढाये, सचिन कदम, रिजवान शेख, महेंद्र भगत, सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here