मिटर जोडणी सदंर्भात अडचणी करिता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क करा – आ. किशोर जोरगेवार

0
84

स्वतंत्र मिटर जोडणी सदंर्भात अडचणी येत असल्यास यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधवा – आ. किशोर जोरगेवार यांचे आवाहण

  विभक्त झालेल्या कुटुबांना गॅस कनेक्शच्या आधारावर स्वतंत्र मिटर देण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणला केल्या होत्या. मात्र विभक्त झालेल्या कुटूबांना स्वतंत्र मिटर जोडणी दिल्या जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामूळे विभक्त झालेल्या कुटुबांना स्वतंत्र मिटर जोडणी संदर्भात अडचणी येत असल्यास अशा नागरिकांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

एका घरी विद्युत मिटर असल्यामूळे कुटुंबा कुटुंबांमध्ये विद्यूत बिलाच्या मुद्यावरुन नेहमी वाद होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी विभक्त कुटुंबाला वेगळी वीज मिटर जोडणी देण्याच्या अनेक मागण्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या त्यानूसार विभक्त झालेल्या कूटुंबाला वेगळे वीज मिटर देण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरनच्या बैठकीत महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांना केल्या होत्या. या सूचनेबाबत महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी सकारात्मकता दाखवत सदर सुचना मान्य केली होती. यावेळी  स्वतंत्र वीज मिटरची मागणी आल्यास सदर ठिकाणची पाहणी करुन गॅस कनेक्शनच्या आधारावर सदर कुटुंबाला स्वतंत्र वीज मिटर उपलब्ध करुन देण्याचे ठरविण्यात आले.  तसेच भाडेकरुंसाठीही स्वतंत्र मिटर देण्याच्या प्रक्रियेतील जाचक अटी सरळ करुन त्यांनाही स्वंतत्र मिटर देण्याची प्रक्रिया सोपी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी या बैठकीत सांगीतले होते त्यानूसार आता अनेक नागरिक स्वंतत्र मिटर जोडणी करिता महावितरन कार्यालयात अर्ज सादर करत आहे. यातील काही नागरिकांना मिटर जोडणी करिता अडचणी येत आहे. अशा अनेक तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात प्राप्त झाल्या आहे. यातील काही तक्रारींचे निवारनही करण्यात आले आहे. नागरिकांना या पूढे स्वतंत्र वीज मिटर जोडणी करिता लागणारी कागदपत्रे योग्य असूनही मिटर जोडणी करिता अडचण येत असल्यास अशा नागरिकांनी जैन भवण जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकातून केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here