चांगुनाबाई मुनगंटीवार ऑटोरिक्षा म्‍हाडा कॉलनी येथे १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिवस उत्‍साह साजरा करण्‍यात आला.

248

Datala

महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्‍या वतीने चांगुनाबाई मुनगंटीवार ऑटोरिक्षा म्‍हाडा कॉलनी दाताळा रोड, चंद्रपूर येथे १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त सांस्‍कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, जिल्‍हा सचिव सुनिल धंदरे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष जहीर शेख, जिल्‍हा संघटन प्रमुख विनोद चन्‍ने, शंकर थोरात, शंकर धुमाडे, किशोर वाटेकर, रमेश वझे, खुशाल साखरकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्‍यात आले.

सर्व प्रथम ध्‍वज फडकवण्‍यात आला. त्‍यानंतर कॉलनीतील लहान मुलांचे सांस्‍कृतीक कार्यक्रम घेण्‍यात आले. सर्व मान्‍यवर पाहुण्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ देवुन स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍याकरीता अंकुश थोरात, शुभम गाऊत, अंकित उमरे, सजल आडेपवार, वेद पोहोकार, आशिष पचारे, नयन चन्‍ने, गणेश वाटेकर, ओम राजबोईनवार, अयान शेख, विलास गाऊत्रे, नहाबभाई, सुधाकर बिससने, राजु वासेकर, मधुकर राऊत, सुधीन बिनगोवार, साजीद शेख, सिमाताई बिसने, नागुलकरताई, ऊगे ताई, विमलताई तोहोगावकर, सुंदराबाई बावणे, समीक्ष गोरघाटे, अश्विनी वासेकर, गुंजन वझे, जुही मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.