बूथ बांधणी : सत्कार सोहळ्याने पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो-डॉ.मंगेश गुलवाडे

0
103

सत्कार सोहळ्याने पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो-डॉ.मंगेश गुलवाडे
———————————-
बूथ रचनेच्या उत्कृष्ट कार्यामुळे तुकुम (उत्तर) व बाबूपेठ (दक्षिण)मंडळाच्या अध्यक्षांचे सत्कार
———————————-
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरात महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार  व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या  अहिर यांच्या मार्गदर्शनात बूथ रचना मजबूत करण्याचे कार्य सुरू आहे.त्यातीलच चंद्रपूर महानगरात पक्ष संघटन बांधणीसाठी विविध मंडळ तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये तुकुम(उत्तर) मंडळाच्या अध्यक्षांनी मतदार यादीचे 59 पेज प्रमुख पैकी 43 तर  बाबुपेठ (दक्षिण) मंडळाच्या अध्यक्षांनी 62 पेज प्रमुख पैकी 41 पेज प्रमुख पूर्ण करून वरिष्ठांना ही संपूर्ण यादी सुपुर्द केली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने तुकुम(उत्तर)मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल डुकरे व बाबुपेठ (दक्षिण)मंडळाचे अध्यक्ष संदीप आगलावे यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे मनोगत व्यक्त करत होते त्यांनी या वेळी सांगितले की सत्कार सोहळ्यामुळे पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच पण अधिक जोमाने कार्य करण्याची शक्ती ही निर्माण होत असते असे त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सदर कार्यक्रमात महानगर संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,कोषाध्यक्ष प्रकाश धारने, महामंत्री तथा बूथ रचनेचे संयोजक ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर,उपाध्यक्ष यश बांगडे,कुणाल गुंडावार,स्नेहीत लांजेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here