राज्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य द्या : यंग चांदा ब्रिगेड

0
42
राज्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य देण्यात यावे, यंग चांदा ब्रिगेडची मागणी
  जिल्हाधिका-यांर्फत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

केशरी शिधापत्रिका धारकांना नियमीत धान्य देण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत अन्न नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सिद्धार्थ मेश्राम, रुपेश मुलकावार, नितेश बोरकुटे, शिवप्रसाद रहांगडाले, नरेश आत्राम, वसीम कुरेशी आदिंची उपस्थिती होती.
दारिद्र रेषेखालील व अल्पउत्पन्न धारकांना शासनाच्या वतीने रेशन दिल्या जाते. यासाठी वर्ग आखून देण्यात आले असून उत्पन्नानूसार पांढरा, पिवळा आणि केशरी अशा शिधापत्रिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यात पिवळा रंगाच्या शिधापत्रिका धारकांना नियमित अन्नधान्य शासकीय स्वस्त दराप्रमाणे मिळत  आहे. मात्र केशरी कार्ड धारकांना कुठल्याही प्रकारचे अन्नधान्य मिळत नाही.  त्यामूळे गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर कामगार या केशरी शिधापत्रीका धारक वर्गाला अन्नधान्याची नितांत गरज आहे. मात्र यांना अन्नपुरवठा होत नसल्याने भयावह परिस्थितीत  सदर नागरिक जीवन जगत आहे.  मार्च २०१९ पासून कोविड – १९ चा प्रादुर्भाव तीव्र झाल्याने सर्व कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडले परिणामी सामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले होते. त्यामुळे राज्यशासनाने कोरोनाचे संकट लक्षात घेऊन केशरी शिधापत्रिका धारकांना मागील वर्षात २ ते ३ महिन्यांचा रेशन मोफत करून दिले होते. मात्र आता ते पून्हा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे केशरी शिधापत्रीका धारकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत राज्यातील संपूर्ण केशरी शिधापत्रिका धारकांना नियमित अन्नधान्य देवून नवक्रांतीची सुरुवात करत गोरगरिबांना न्याय  दयावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने सदर पत्राच्या माध्यमातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here