त्या आरोपींना कठोर शिक्षा द्या !

0
136

!त्या आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे!………..

आदिवासी बहूल जंगलव्याप्त दुर्गम भागातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात येणाऱ्या वणी (खुर्द)या गावात माणुसकीला काळिमा फासणारी आणि पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी, जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आल्यापासून18वि घटना घडली. जादूटोण्याच्या संशयावरून गावकर्यांनी दलित समाजातील शांताबाई कांबळे(53)शिवराज पांडुरंग कांबळे(74)साहेबराव एकनाथ हुके(48)प्रयागबाई एकनाथ हुके(64)एकनाथ नारायण हुके(70)धम्मशिला सुधाकर हुके(38)पंचफुला शिवराज हुके(55)वर्ष वयाच्या अशा7लोकांना दोराने बांधून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना मारहाण केली. यातील5लोकं गंभीर अवस्थेत असून त्यांच्या जीवाला धोका आहे. यातील कोणी दगावल्यास मारहाण कर्त्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना फासावर लटकवा अशी मागणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली आहे. समयसूचकता दाखवून जीवाची पर्वा न करता वेळेवर पोलिसांना पाचारण करून खेरलांजी सारखं प्रकरण होता होता वाचवणाऱ्या अनिल सोनकांबळे या युवकाला शासकीय सेवेत सामावून घेण्याची, पीडितांना आर्थिक मदत करून त्याच गावात पूर्णवेळ पोलीस संरक्षण देऊन त्या गावात पोलीस चौकी बसवण्यात यावी आणि पीडितांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे कारण हा न पुसला जाणारा कलंक घेऊन ते कुठे जातील?कोणत्या गावातील लोकं त्यांना स्वीकारतील प्रत्येक ठिकाणी त्यांना संशयीत नजरेने बघितले जाईल म्हणून त्याच गावात त्यांची व्यवस्था करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. जर ह्या पीडितांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.शिष्टमंडळात दशरथ शेंडे, रेखा तेलतुंबडे, ऍड. अरविंद पेटकर, अमर गोंडाने, डॉ. मनोज तेलंग, प्रेमचंद्र मुंजाणकार आदी उपस्थित होते वरोरा तालुक्याच्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी हे निवेदन स्वीकारल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here