शाळुच्या मातीपासून सुबक गणेश मूर्ती : चिमुकल्याचे होत आहे कौतुक

104

शाळुच्या मातीपासून सुबक गणेश मूर्ती साकार शहरात चिमुकल्याचे कौतुक
बल्लारपूर- अक्षय भोयर(ता,प्र)

बल्लारपूर – बल्लारपूर शहरातील प्रसिद्ध कंत्राकदार सामाजिक व राजकारणी श्री निलेश पांडुरंग खरबडे यांचे चिरंजीव ९ वर्षीय शीर्ष निलेश खरबडे यांनी शाडूच्या मातीपासून सुंदर अशी गणेश मूर्ती साकार केली आहे , शीर्ष हा अवघ्या ९ वर्षाचा असून अनेक कार्यक्रमात सहभागी होतो ,गणेश चतुर्थी असो किंवा दसरा, होळी, या सर्व सनाणंमध्ये तो स्वता मेहेनत घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी करतो ,
टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू कसे तयार करायचे या छोट्या बालकाने नेहमी बल्लारपूर वासीयांना शिकविले आहे , त्याच्या या कलाकारवृत्तीला बघून त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे