करणी सेना जिल्हा अध्यक्ष यांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत प्रवेश

35

चंद्रपूर जिल्हातील करणी सेना जिल्हा अध्यक्ष यांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत प्रवेश

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

चंद्रपूर जिल्ह्यातील करणी सेनेच्या जिल्हाध्यक्ष श्रेयांश ठाकुर व त्यांचे सहकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश केला वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष या पदावर श्रेयांश ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांना नियुक्त करण्यात आले.
तसेच राकेश बहुरीया यांची शहर उपाध्यक्ष तर जय ठाकूर यांची शहर चिटणीस असे पद देऊन पक्षाची वाहतूक सेनेची जबाबदारी देण्यात आली,
या वेळी वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता महिला सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकुर महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष मायाताई मेश्राम,शोभाताई वाघमारे आदी उपस्तीत होते