प्रा. दिनेश दुर्योधन यांना आचार्य पदवी

40

प्रा. दिनेश दुर्योधन यांना आचार्य पदवी

  1. प्रतिनिधी राजुरा : येथील अँड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत रसायनशास्त्र विषयाचे प्रा. दिनेश दिवाकर दुर्योधन यांना आचार्य (पी.एच.डी) पदवी गोंडवाना विद्यापीठातून प्राप्त झाली. त्यांचे संशोधनाचा विषय “सिन्थेसिस अँड कॉरेक्टरीझेशन ऑफ व्हॅल्यूअबल मटेरिअल्स फ्रॉम राईस हस्क” हा होता. त्यांना संशोधनात प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु, ताई गोलवलकर महाविद्यालय, रामटेक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. डॉ. राजीव वेगिनवार यांचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर धोटे, उपाध्यक्ष माजी आमदार ऍड. संजय धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉ. अर्पित धोटे, संचालक मोहन धोटे, डॉ. अश्विनी बलकी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशात कुटुंबीयांचे व मित्रांचे सहकार्य लाभले असे प्रा.दिनेश दुर्योधन म्हणतात.