आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केला शिक्षकांचा गौरव

0
10

————————————–
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केला शिक्षकांचा गौरव
————————————–
आ.अशोक उईके व आ.संजीवरेड्डी बोदकूलवार तसेच महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांची प्रमुख उपस्थिती
————————————
भाजपा चंद्रपूर महानगरच्या वतीने शिक्षक दिनानिमित्य शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून 50 शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी होऊन शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच माजी मंत्री आ. अशोक उईके यांनी विध्यार्थ्यांवर जे संस्कार होत असतात ते संस्कार शिक्षकांच्या माध्यमातून होत असतात त्यामुळेच विध्यार्थ्यांनच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा मोलाचा वाटा असतो असे त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर आ.संजीवरेड्डी बोदकूलवार यांनी प्रत्येक शिक्षक विध्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन देत असतो व त्या मार्गदर्शनाच्या जोरावरच प्रत्येक विध्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होऊन सामाजिक व राजकीय जीवनात प्रगती साधत असतो असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना शिक्षकांचे कार्य हे जिवनात कधीही न विसरणारे असून त्यांच्या कार्यामुळेच विध्यार्थी घडत असतो असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात आदर्श शिक्षकांचा सत्कार करून त्यांना सन्मान पत्र प्रदान करण्यात आले यावेळी कार्यक्रमात विदर्भाचे  संकलन समिती प्रमुख श्री.नाना कुलकर्णी,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य
विजय राऊत व तुषार सोम, महामंत्री सुभाष कासंनगोट्टूवार
ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,उपाध्यक्ष अरुण तिखे,मायाताई मांदाळे,सचिव रामकुमार आक्केपेल्लीवार,मंडळ अध्यक्ष
सचिन कोतपल्लीवार,दिनकर सोमलकर,रवी लोणकर,संदीप आगलावे,विठ्ठल डुकरे,नगरसेवक प्रदीप किरमे,वंदना तिखे,सोपान वायकर,शिलाताई चव्हाण
मायाताई उईके,पूनम गरडवा,स्मिता रेबनकर,अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष आमीन शेख,मंडळ महामंत्री मनोरंजन रॉय,अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,मंडळ महामंत्री संजय निखारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,दिवाकर पुद्दटवार,प्रीती भूषणवार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम संचालन    डॉ.भारती दुधाणी   यांनी  तर आभार   मोहम्मद गिलानी  यांनी मानले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here