वनिता बलकी यांना जि.प. चा आदर्श शिक्षिका पुरस्कार

36

वनिता बलकी यांना जि.प. चा आदर्श शिक्षिका पुरस्कार =
= भद्रावती तालुक्यात उपक्रमशील शिक्षिका म्हणून परीचय =

………………………………………………………………………………………………
भद्रावती = तालुक्यातील कुनाडा जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वनिता मनोहर बलकी यांना अलिकडेच शिक्षकदिनी चंद्रपूर जिल्हा परीषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.वनिता बलकी आणि त्यांचे पती मनोहर बलकी यांना संयुक्तपणे जि.प. चंद्रपूरच्या कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात सदर पुरस्कार जिल्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते व जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपूर्वक देण्यात आला. यावेळी आ. किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, शिक्षणाधिकारी ( माध्य. ) उल्लास नरड व शिक्षणाधिकारी ( प्राथ. ) दिपेन्द्र लोखंडे प्रामुख्याने हजर होते.
पुरस्कारा दाखल बलकी दाम्पत्यांना शाल, श्रीफळ, साडी, चोळी, शर्ट – पॅन्ट पीस , प्रशस्तीपत्र , स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले. शिक्षिका वनिता बलकी मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय गट शिक्षणाधिकारी धनपाल फटींग, केंद्र प्रमुख भारत गायकवाड, मुख्याध्यापिका ज्योती नाकाडे, ढोरवासा केंद्रातील सर्व शिक्षक बंधू -भगिनी, पती मनोहर बलकी, सासू प्रेमीला बलकी, सारसे देवराव बलकी, आई छबूताई कष्टी, वडील विठ्ठल कष्टी , मुलगा केतन व मुलगी महती यांना देतात.