काँग्रेस अनुसूचित जाती बल्लारशाह विधानसभा अध्यक्षपदी सुयोग खोब्रागडे

0
71

काँग्रेस अनुसूचित जाती बल्लारशाह विधानसभा अध्यक्षपदी सुयोग खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली
बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

बल्लारपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीनजी राऊत,अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष विजय आंबोरे, पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर ,श्री. मा.आ. सुभाष भाऊ धोटे, सौ. मा.आ. प्रतिभाताई धानोरकरयांच्या आदेश व सूचनेनुसार सुनील विश्वनाथ पाटील यांना अनुसूचित जाती विभागाचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली तर सदाशिव संजय खोब्रागडे यांची चंद्रपूर तालुका सचिवपदी निवड करण्यात आली.
चंद्रपूर वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळु भाऊ धानोरकर, व अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत नेऊन राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन खासदार बाळु धानोरकर यांनी केले.
सुयोग यांनी कोरोना काळात जम्बोद्वीप संस्थे मार्फत गरजू लोकांना २वेळचे जेवण पोहचविणाचे काम केले त्याचीच एक पावती म्हणून सुयोग यांची नियुक्ती करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here