*यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाची विभागीय कार्यकारणी गठीत*

0
96

*यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाची विभागीय कार्यकारणी गठीत*

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाची विभागीय कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या विभागाच्या नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यंग चांदा ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्या जात आहे. ही संघटना वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून गरजू पर्यंत पोहचून त्यांना शक्य ती मदत करण्याचे काम करत आहे. दरम्याण या संघटनेच्या आदिवासी विभागाची विभाग कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. यामध्ये नरेश आश्राम यांची यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी आघाडीच्या उपाध्यक्षपदी, रवि मसराम यांची आदिवासी आघाडी शहर सचिवपदी, सुरज गावडे यांची आदिवासी आघाडी जलनगर प्रभाग अध्यक्षपदी, सोमेश राजगडकर यांची आदिवासी आघाडी पठाणपूरा प्रभाग अध्यक्षपदी, वैष्णव वेलादी यांची आदिवासी आघाडी विठ्ठलमंदिर प्रभाग अध्यक्षपदी, तेजेंद्र कुळमेथे यांची आदिवासी आघाडी श्यामनगर प्रभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रुपेश मुलकावार यांची एस.बी.सी शहर संघटकपदी, सतिष सोनटक्के यांची ओबीसी सेल शहर उपाध्यक्षपदी, शिवप्रसाद रहांगडाले यांची इंदिरानगर प्रभाग ओबीसी सेल अध्यक्षपदी तर सिध्दार्थ मेश्राम यांची जेष्ठ मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत पदांची जबाबदारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here