खरवड येथील शेतातील उभ्या पिकाच्या सोयाबीनची चोरी.

0
120

प्रकाश ठाकरे यांच्या खरवड येथील शेतातील उभ्या पिकाच्या सोयाबीनची चोरी.

तंटामुक्ती अध्यक्ष
लक्ष्मण गिरडकर, किशोर गाठे
प्रफूल गिरडकर, रविंद्र डवरे,सुधीर घामट, नानाजी ढोले, संदीप ऊलमाले यांच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशन मधे तक्रार.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील खरवड येथील प्रकाश ठाकरे यांच्या सामाईक मालकी व ताब्यातील मौजा खरवड, तह, वरोरा, जि. चंद्रपूर येथील शेत भुमाक. १७१/८, आराजी हे ५-८० हे आर हया वर्णनाची शेतजमीनितील उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाची चोरी तंटामुक्ती अध्यक्ष
लक्ष्मण गिरडकर, किशोर गाठे
प्रफूल गिरडकर, रविंद्र डवरे,सुधीर घामट, नानाजी ढोले, संदीप ऊलमाले यांनी शेतात हारवेस्टर करून केल्याने त्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून शेतकरी प्रकाश ठाकरे यानी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

सदर शेतजमीन ही प्रकाश ठाकरे व त्यांच्या भावाच्या नावाने रेकॉर्ड वर असताना व सदर शेत जमीनी संबंधाने कोर्ट विद्यमान जिल्हा न्यायाधिश – १, वरोरा ह्यांच्या न्यायालयात या प्रकरणी दिनांक ०८/१०/२०२१ रोजी प्रकाश ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागलेला असताना तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गिरडकर, किशोर गाठे, प्रफूल गिरडकर, रविंद्र डवरे,सुधीर घामट, नानाजी ढोले, संदीप ऊलमाले यांनी ठाकरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी करून त्या पिकाची चोरी केल्याने प्रकाश ठाकरे यांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार करून आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु वरोरा पोलीस स्टेशन मधून सदर प्रकरणात कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने शेतकरी प्रकाश ठाकरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन माझ्या जवळपास 5 लाख रुपयाच्या सोयाबीन पिकाची चोरी करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

प्रकाश ठाकरे यांच्या खरवड येथील शेतात त्यांनी सोयाबीन पेरले होते व त्या शेतीवर त्यांचाच ताबा आहे, मात्र सदर शेत जमीन ही प्रकाश ठाकरे व व त्यांचे भाऊ हयांच्या ताब्यात व वहिवाटीत असताना व सदर शेतात चालू कास्तकारी हंगामात सोयाबीन हया पिकाची लागवड केली होती हे तलाठी रेकॉर्ड वर असताना खरवड येथील आरोपींनी शेतमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून सोयाबीनच्या पिकाची कापणी केली व ते पीक चोरून नेल्याची बाब शेतकरी प्रकाश ठाकरे यांना दिनांक १३/१०/२०२१ रोजी कळली त्यात ४ ते ५ ट्रॅक्टरने,हारवेस्टर व तसेच इतर मजुरांच्या मद्दतीने सोयाबीन चे पीक कापून चोरुन नेले असल्याने त्याबाबत पोलीस स्टेशन मधे प्रकाश ठाकरे यांनी दिली मात्र यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे शेतकऱ्यांनी धाव घेऊन न्याय देण्याची मागणी केली यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here