चंद्रपूरच्‍या विकासासाठी मनपा व भाजपा नगरसेवकांचे काम कौतुकास्‍पद – आ. मुनगंटीवार भाजपा शास्‍त्रीनगर प्रभाग क्र. २ मधील विविध विकासकामांचे लोकार्पण

0
65

चंद्रपूरच्‍या विकासासाठी मनपा व भाजपा नगरसेवकांचे काम कौतुकास्‍पद – आ. मुनगंटीवार

भाजपा शास्‍त्रीनगर प्रभाग क्र. २ मधील विविध विकासकामांचे लोकार्पण

 

कुठल्‍याही शहराच्‍या विकासामध्‍ये तिथली स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था किती सक्रीय आहे यावर त्‍या शहराचा विकास अवलंबून असतो. चंद्रपूरात महानगरपालिका गेल्‍या अनेक वर्षांपासून भाजपाच्‍या ताब्‍यात आहे. त्‍याचाच परिणाम म्‍हणून चंद्रपूरचा विकास अतिशय वेगाने होत आहे. मनपाचे पदाधिकारी व भाजपाचे नगरसेवक उत्‍तमरितीने काम करीत आहेत. असेच काम त्‍यांनी यापुढेही करावे असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भाजपा शास्‍त्रीनगर प्रभाग क्र. २ द्वारा आयोजित जलशुध्‍दीकरण केंद्र तुकूम जवळील हायमास्‍ट लाईटचे लोकार्पण, उपगन्‍लावार लेआऊट येथील डॉ. देवतळे नर्सिंगहोम ते जलशुध्‍दीकरण केंद्र या रस्‍त्‍याचे लोकार्पण, प्रभागातील ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार तसेच भगवान बिरसा मुंडा मार्गाचे फलक अनावरण अशा विविध कार्यक्रमप्रसंगी आ. मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना आ. मुनगंटीवार यांनी त्‍यांच्‍या मंत्री पदाच्‍या काळात चंद्रपूर शहरात केलेल्‍या कामांची यादी सादर केली. ज्‍यामध्‍ये वनअकादमी, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय, टाटा कॅन्‍सर हॉस्‍पीटल, बाबा आमटे अभ्‍यासिका, विविध रस्‍ते, अमृत पाणी पुरवठा योजना, महाकाली मंदिराचे सौंदर्यीकरण, बाबुराव शेडमाके स्‍टेडियम, विविध भागातील खुल्‍या जागांचे सौंदर्यीकरण, विविध चौकांचे सौंदर्यीकरण या व अशा अनेक कामांसाठी पैसा ओढून आणला. गेल्‍या अनेक वर्षांमध्‍ये या शहराचा एवढा विकास करण्‍याचे भाग्‍य मला लाभले याकरिता मी माता महाकालींला नमन करतो, असेही पुढे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

या कार्यक्रमाला महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष ग्रामीण देवराव भोंगळे,  भाजपा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती संदीप आवारी, भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजपा महामंत्री ग्रामीण नामदेव डाहूले, सभापती महिला व बालकल्‍याण सौ. पुष्‍पा उराडे, उपसभापती महिला व बालकल्‍याण कु. शितल कुळमेथे, सभापती झोन क्र. १ सौ. छबू वैरागडे, मनपा सदस्‍या शिला चव्‍हाण, वंदना तिखे, वंदना जांभुळकर, माया उईके, सविता कांबळे, आमीन शेख, प्रमोद शास्‍त्रकार, सुनिल डोंगरे, सतीश तायडे, पुरूषोत्‍तम सहारे, प्रज्ञा गंधेवार, सपना नामपल्‍लीवार, सतीश अवताडे, श्रावण ननावरे, रामराव हरडे, स्‍वप्‍नील डुकरे, प्रभा गुडधे, डॉ. शरदचंद्र सालफळे, वंदना संतोषवार, रूद्रनारायण तिवारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रविंद्र गुरनुले यांनी, संचालन सौ. सविता कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन विठ्ठल डुकरे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here