राष्ट्रीय चेस्टोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला कांस्य पदक : अमरावती नारायणा विद्यालयाची खेळाडू खुशी उपरेची उत्कृष्ठ व चमकदार कामगिरी

0
227

राष्ट्रीय चेस्टोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला कांस्य पदक

अमरावती नारायणा विद्यालयाची खेळाडू खुशी उपरेची उत्कृष्ठ व चमकदार कामगिरी

अमरावती : रामागुंडम (तेलंगणा) येथे झालेली दुसऱ्या राष्ट्रीय फेडरेशन चेस्टोबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तिसऱ्या स्थानावर आपले नाव नोंदवले या संघामध्ये नारायणा विद्यालयाची खुशी प्रभाकर उपरे या महिला खेळाडूंचा समावेश होता.या स्पर्धेमध्ये खुशी उपरे यांची उत्कृष्ठ व चमकदार कामगिरी राहिली त्या बद्दल खुशीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, खुशीने आपल्या यशाचे श्रेय नारायण विद्यालयाचे प्राचार्य व आपल्या आई व वडिलांना देत पुढील स्पर्धेची जोरदार तयारी करीत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र संघाचे कोच नंरेद्र चंदेल, महाराष्ट्र सचिव अंकीत भगत, यांचें नेतृत्वात कर्णधार म्हणून शीतल पाचभाई, आश्वानी तातकंतीवार, राजेश्री पचारे, प्रणाली कुंबरे,प्रेरणा निमस्तकार, वैष्णवी निखाडे, लक्ष्मी खिरातकर, अंजली चौधरी, वैष्णवी दहिवलकर, सरिता बुराडे या खेळाडूंचा समावेश होता , सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here