राष्ट्रवादी कांग्रेसची विदर्भातील पक्षबांधणी ही लोकसभा केंद्रीत असावी : ओबिसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

0
141

*राष्ट्रवादी कांग्रेसची विदर्भातील पक्षबांधणी ही लोकसभा केंद्रीत असावी : ओबिसी नेते डॉ. अशोक जीवतोडे*

*जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची जिल्हा आढावा बैठक जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न


 

चंद्रपुर (प्रतिनिधी) :
यापुर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेवुन मित्रपक्षांना विजयश्री प्राप्त करुन दिली. राष्ट्रवादी पक्षाची ताकद या जिल्ह्यात वाढविण्याची हीच खरी वेळ आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार या जिल्ह्यात निवडून येण्याची सुचिन्हे आहेत. ओबिसी, आदिवासी समाज व ईतर सर्वच पक्ष भ्रम निराश झाल्याने भारतीय जनता पक्षाशी नाराज आहे. तो कांग्रेस कडे वळू शकत नाही. त्यामुळे हा समाज राष्ट्रवादीला पसंत करीत आहे. राष्ट्रवादी कांग्रेसची विदर्भातील पक्षबांधणी ही लोकसभा केंद्रीत असावी, असे मत डॉ. अशोक जीवतोडे यांनी येथे आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत मांडले.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दोन दिवसीय चंद्रपुर जिल्हा दौरा पार पडला. या दरम्यान स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची जिल्हा आढावा बैठक (दि.१९) ला पार पडली. यावेळी सर्वप्रथम जेष्ठ नेते शरद पवार यांची पत्रपरीषद पार पडली. व त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांसह आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी मा. प्रफुल पटेल, संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा निरीक्षक प्रविण कुंटे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजेंद्र जैन, चंद्रपुर जिल्हा निरिक्षक प्रविण कुंटे, सुनिल फुंडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुध्दे, वसंतराव भुईखेडकर, ख्वाजा बेग, डॉ. भालचंद्र चोपणे, डॉ. लोढा, जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महानगर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, रायुकांचे जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर, उल्हास करपे, वर्षा निकम, जया देशमुख, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here