पत्नी पीडित पुरुषांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

315

*पत्नी पीडित पुरुषांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन*
वरोरा:-समाजात कौटुंबिक प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत प्रत्येक घरात काहींना काही कौटुंबिक कलह असतोच त्यात काही विघ्नसंतोषी महिला स्त्री संवरक्षणासाठी असलेल्या कायद्याचा दुरुपयोग करून पुरुष व त्याच्या कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करतात.भारतीय परिवार बचाओ संघटनेच्या शिष्टमंडळाने वरोरा येथील पोलीस निरीक्षक श्री दीपक खोब्रागडे याना निवेदन दिले महिला कायद्याचा व पुरुष विरोधी कायदा व समाजाची विचार धारणा या संदर्भात सविस्तर,सांगोपांग,सकारात्मक चर्चा घडून आली.त्यात महिला व पुरुष यांच्याकरिता समानता राखणारे कायदे व्हावेत असा सूर निघाला शिष्टमंडळात भारतीय परिवार बचाओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,मोहन जीवतोडे,सुदर्शन नैताम,वसंता भलमे, प्रशांत मडावी,गंगाधर गुरनुले,नितीन चांदेकर,पिंटू मुन,वामन मेश्राम,किशोर जांपालवर आदी उपस्थित होते.महिला बिचारी नाही,पुरुष अत्याचारी नाही.काळ बदलला आहे पुरुष स्त्री वर अन्याय करतो असे समाजाने गृहीतच धरलेले आहे.आता स्त्री पुरुषावर सासरवर अत्याचार करतांना बघण्याची वेळ आलेली आहे.70%घरात महिलांचे राज्य आहे महिलाच पुरुषांना कायद्याचा धाक दाखवून त्यांचा अतोनात छळ करतात परंतु पुरुष त्याचेवर झालेल्या अन्यायाची वाच्यता कुठे करीत नाही.कारण समाज हा स्त्रीचीच बाजू घेतो म्हणून त्याविपरित पत्नी पती,सासरचे गाऱ्हाणे बोरिंग वर,विहिरीवर महिलांना सांगून हस्त्या खेळत्या परिवाराला बदनाम करते पुरुषानो आता लाजू नका आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडा आपल्या समस्या पोलिसात द्या.बऱ्याच महिला पती सासर ला गजाआड करण्याची खुमखुमी दाखवितात हुंडाबळी 498 (अ)या कायद्याच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब उध्दवस्थ झाली.जनावरांकरीता आयोग आहे परंतु या देशात पुरुष प्रधान संस्कृती असून पुरुषाकरिता साधा पुरुष आयोग नसावा ही खेदाची बाब आहे महिला कायदे शिथिल करून पुरुष व महिला दोघांनाही समान कायदे करून वेळीच आवर न घातल्यास अनेक कुटुंब हुंडाबळीच्या आगीत उध्वस्त होतील.