शासकीय आदिवासी वसतीगृह तात्काळ सुरु करण्यात करा , यंग चांदा ब्रिगेडची मागणी : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन   

115

शासकीय आदिवासी वसतीगृह तात्काळ सुरु करण्यात यावे, यंग चांदा ब्रिगेडची मागणी

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन   

कोविड अनुषंगाने जिल्हा प्रशासनाअंतर्गत मनपा चंद्रपूर कडे असलेले सर्व शासकीय आदिवासी वसतिगृह संबंधित विभागाकडे हस्तांतरण करून ते तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सोमेश राजगडकर, वैष्णव वेलादी, मनोहर मेश्राम, नितेश बोरकूटे, सोनू चांदेकर, अजय मेश्राम, तेजेंद्र कुळमेथे, नरेश आश्राम आदिंची उपस्थिती होती.

  कोविड रुग्णांसाठी  चंद्रपूर शहरातील शासकीय आदिवासी वसतिगृह प्रशासनाने मागील वर्षभरापासून ताब्यात घेतले आहे. मात्र आता जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नियमित सुरु झाल्या आहेत. मात्र आदिवासी वसतीगृह प्रशासनाच्या ताब्यात असल्याने वसतिगृहाअभावी विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव भाड्याची खोली करून रहावे लागत आहे. अशात अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे शाळा सुरु होवून देखील विद्यार्थी आपल्या स्वगावीच आहेत. त्यातच परीक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांचे  मोठ्या प्रमाणात शैक्षणीक नुकसान होत आहे. त्यामूळे या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडे ताब्यात असलेले सर्व शासकीय वसतिगृह पुढील ४ दिवसात संबंधीत विभागास हस्तांतरण करून वसतिगृह विद्यार्थ्यांकरिता तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाकडून करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास वसतिगृह विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनआंदोलन करण्याचा ईशाराही त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.