केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य विरोधी : विदर्भवादी नेते डॉ. अशोक जिवतोडे

124
केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य विरोधी : विदर्भवादी नेते डॉ. अशोक जिवतोडे
स्वतंत्र विदर्भावर साधारण सहमती झालेली नाही, अशी भुमिका मांडत केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भाची मागणी धुडकावली
चंद्रपुर :
             स्वतंत्र विदर्भावर साधारण सहमती झालेली नाही, अशी स्पष्ट  भुमिका मांडत केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भाची मागणी धुडकावून लावली आहे. स्वतंत्र विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन नाही, असेही केंद्र शासनाने म्हटले आहे. हा विदर्भावर अन्याय असुन विदर्भातील जनतेचा भाजप सरकार विश्वासघात करीत असल्याचे मत ओबीसी व विदर्भवादी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी मांडले आहे.
            स्वतंत्र विदर्भ व्हावा, ही मागणी अत्यंत जुनी आहे. महाराष्ट्र व विदर्भातील अनेक भाजप नेत्यांनी याअगोदर स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आहे. राज्यात सत्तेत येण्याअगोदर स्वतंत्र विदर्भ राज्य हा भाजपचा अजेंडा होता. मात्र तेव्हा राज्यात व केंद्रात तथा आताही केंद्रात सत्ता असुनही भाजप स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला न्याय देण्यास कसूर करीत आहे. प्रस्ताव विचाराधिन नसल्याचे नेमके कारण काय असेल, स्वतंत्र विदर्भाची मागणी रेटून धरणा-यांना केंद्र शासनाच्या या भूमिकेने जबर धक्का बसला आहे. असे मत विदर्भवादी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी मांडले आहे. सोबतच विदर्भातील जनतेनी केंद्र सरकारच्या व स्थानिक भाजपाई नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेला ओळखले पाहिजे, असे आवाहन केले आहे.