आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्य विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

58
  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्य विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, रक्तदान शिबीरआरोग्य शिबीर अणि दिव्यांग बांधवांना तिन चाकी सायकलचे वितरण

उद्या शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्य यंग चांदा ब्रिगेड व सामाजिक संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आ. किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य यंग चांदा ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहरात सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० वाजता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराने या कार्यक्रमांना सुरवात होणार आहे. या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. तर सकाळी १०.०० वा. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वितरीत करण्यात येणार आहे.  सकाळी 10.30 वा. आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात २०२२ या नव्या वर्षाच्या यंग चांदा ब्रिगेडच्या दिनदर्शिकेच्या विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 11 वाजता यंग चांदा ब्रिगेडच्या पडोली शाखेच्या वतीने भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर शिबिराचा पडोली वासियांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडचे सोशल मिडीया प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार यांनी केले आहे.  यावेळी गणमान्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तर दुपारी 2 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात भव्य कार्यकर्ता प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडचे युवक शहराध्यक्ष कलाकार मल्लारप यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शेकडो युवक यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेणार आहेत. सांयकाळी 5 वाजता जटपूरा गेट येथे एम एच 34 सुशिक्षीत बेरोजगार इंजिनीअर  गृप तथा यंग चांदा ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग बांधवांसाठी तिन चाकी सायकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर आणि राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सदर सायकल वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील नामांकीत डॉक्टरांसह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच नोरमा हेल्थकेअर ट्रस्टच्या वतीनेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्य बंगाली कॅम्प येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत हद्यरोग तपासणी, ईसीजी, पोटांच्या विकारावर उपचार, मुळव्याधची दुर्बिणीद्वारे तपासणी, स्त्रीरोग तपासणीसह कुटुंब नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात शल्य चिकित्सक डॉ. राकेश. आर. वनकर, स्त्रिरोग तथा प्रसुती तंज्ञ डॉ. वैभव पोडचलवार आणि मानसिक रोग तज्ञ डॉ. अमर गोलदार यांनी आपली निशुल्क सेवा देणार आहेत. तर ऐदेन्स सेवियर्स फाउंडेशनच्या वतीने  गरजुंना ब्लॅकेंट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजूंना वाढत्या थंडीतून संरक्षण मिळावे या करिता ब्लॅकेंट वाटप करण्यात येणार आहे. अशा विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्या शुक्रवारी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

  पूष्पगुच्छ नको पूस्तक दयायंग चांदा ब्रिगेडचा उपक्रम

  उद्या शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी येणा-या शुभेच्छुकांनी पूष्पगुच्छ  देण्याएैवजी एमपीएसी किंव्हा युपीएससी ची पुस्कते भेट स्वरुपात दयावीत असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात येणारी पूस्तके गरजू विद्यार्थांना वितरीत करण्यात येणार आहे.