मार्निंग वाकला गेलेली महिला वाघाचा हल्यात ठार :- महिनाभरातील चौथी घटना

318

मार्निंग वाकला गेलेली महिला वाघाचा हल्यात ठार
⭕ महिनाभरातील चौथी घटना

चंद्रपूर (प्रतिनिधी) : 16 डिसेंबर 2021

पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम आहे.आज सकाळला मार्निक वाकला गेलेल्या महीलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची दुदैवी घटना घडली.संध्या बावणे असे मृत महीलेचे नाव आहे.ती वेळवा येथिल रहीवासी आहे.

मागील महीण्याभरापासून पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत सूरू आहे.महीण्याभरात वाघाने चार बळी घेतले आहे.दरम्यानचा काळात वनविभागाने गस्त वाढविली.वाघाचा हालचालीवर नजर ठेवली होती.मात्र आज पुन्हा वाघाने हल्ला करीत महीलेचा बळी घेतला.घटनेची माहीती मिळताच वनविभाग,पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने तालुक्यात दहशत पसरली आहे.