वीज प्रवाहाने वाघाला ठार मारून जमिनीत पुरले :- संशयित आरोपी चार जणांचा ताब्यात

162

वीज प्रवाहाने वाघाला ठार मारून जमिनीत पुरले
⭕ संशयित आरोपी चार जणांचा ताब्यात

चंद्रपूर : वीज प्रवाहाने वाघाला ठार मारून जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरूवारी (16 डिसेंबर) उघडकीस आला. वनविभागात खळबळ उडविणारी ही घटना जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील पेंढरी उपवनक्षेत्रात घडली.

या प्रकरणी वनविभागाच्या चमुने संशयित आरोपी मारोती गेडाम, रामदास शेरकी, हिराचंद भोयर, पांडूरंग गेडाम यांना ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून वाघाच्या अकरा मिश्या जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास सावली वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. वृत्तलिहिस्तोवर वनविभागाचे पथक तपास करीत होते.