विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा*

30

*विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा*
*रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे अणि स्पर्धा परिक्षा पुस्तके वाटप*

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवस आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करुन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर, गुरुद्वारा, बाबा तुल्ल:ह शाहा दर्गाह, आंद्रिय चर्च इत्यादि धार्मिक स्थळी भेट देत चंद्रपूरकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आ. किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमीत्य यंग चांदा ब्रिगेड व सामाजिक संघटनांच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगराध्यक्ष दिपक जयस्वाल, माजी नगराध्यक्षा सुनिता लोढीया, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, नगरसेवक प्रशांत दानव, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, शिक्षण विभागाचे अध्यक्ष प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे युथ अध्यक्ष राशिद हुसेन यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. सदर रक्तदान शिबिरात युवकांसह महिला रक्तदात्यांही रक्तदान करत आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात एमपीएससी व युपीएससीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मदत व पूनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके वितरित करण्यात आलीत. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कॉंग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगर सेवक नंदु नागरकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, सायली येरणे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, माजी महापौर संगीता अमृतकर, नगर सेविका सुनिता लोढीया, प्रदेश कॉंग्रेसचे कमिटीचे शिवा राव, सचिन कत्याल, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या शुभेच्छुकांनी पूष्पगुच्छ ऐवजी एमपीएससी किंव्हा युपीएससी स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट स्वरुप द्यावी असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते. त्यामूळे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या शुभेच्छुकांनी सदर पुस्तक मोठ्या प्रमाणात भेट स्वरुपात देण्यात आलीत. या पुस्तकांचा वितरण सोहळाही आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सदर स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तर दुपारी १२ वाजता आ. किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात २०२२ या नव्या वर्षाच्या यंग चांदा ब्रिगेडच्या दिनदर्शिकेच्या विमोचन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे शहर युवा अध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे युवा नेते अमोल शेंडे, करणसिंह बैस, राजू जोशी, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अल्पसंख्याक विभागाचे यूथ अध्यक्ष राशिद हुसेन, विश्वजीत शाहा, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सायंकाळी 5 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात भव्य कार्यकर्ता प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडचे युवक शहराध्यक्ष कलाकार मल्लारप यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात कलाकार मल्लारप यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतला. आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात यंग चांदा ब्र्रिगेडचा डुपट्टा टाकून संघटनेत त्यांचे स्वागत केले यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे यूथ अध्यक्ष राशिद हुसेन, विनोद अनंतवार, अमन खान, सन्नी बोपारा, जावेद शेख, तिरुपती कलगुरुवार, भुषन पोथीवाल, रंकीत वर्मा, धनंजय यादव, प्रणय चाहंदे, रमेश पूलीपाका, अक्षय रेनकुंटला, सागर गुप्ता, अविनाश गांडला, मुकेश चव्हाण, प्रकाश एलटम यांच्यासह इतर कार्यर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पडोली येथेही यंग चांदा ब्रिगेडच्या पडोली शाखेच्या वतीने भव्य आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेत आपली तपासणी करुन घेतली. तपासणी नंतर त्यांच्यावर मोफत औषधोपचारही करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण अध्यक्ष राकेश पिंपळकर, सोशल मिडीया प्रमूख नकुल वासमवार, युवा नेते विक्की रेगंट्टीवार, गणेश पाचभाई, सुरज मेघवानी, राकेश सोनकुसरे, सुभाष मंगाम यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पडोली शाखेतील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर मनोरमा हेल्थकेअर ट्रस्टच्या वतीनेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमीत्य बंगाली कॅम्प येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत हद्यरोग तपासणी, ईसीजी, पोटांच्या विकारावर उपचार, मुळव्याधची दुर्बीनद्वारे तपासणी, स्त्रीरोग तपासणीसह कुटुंब नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात शल्य चिकित्सक डॉ. राकेश. आर. वनकर, स्त्रिरोग तथा प्रसुती तंज्ञ डॉ. वैभव पोडचलवार आणि मानसिक रोग तज्ञ डॉ. अमर गोलदार यांनी आपली निशुल्क सेवा दिली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या शिबिराचा लाभ घेतला. तर ऐदेन्स सेवियर्स फाउंडेशनच्या वतीने गरजुंना ब्लॅकेंट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजूंना वाढत्या थंडीतून संरक्षण मिळावे या करिता ब्लॅकेंट वाटप करण्यात आले. सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या युवक आघाडी, महिला आघाडी, युवती आघाडी, कामगार संघटना, आदि शाखांच्या पदाधिका-यांनी अथक परिश्रम केले.