यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

0
77

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आज  राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शाहू महराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रंसगी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे युवा संघटक, कलाकार मल्लारप, सलीम शेख, विश्वजित शाहा, दुर्गा वैरागडे, विमल कातकर, वैशाली रामटेके, आरती आगलावे, शमा काजी, संकीता विश्वोजवार, मेहरुन पठान, आदिंची उपस्थिती होती.
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज सर्वेत्र साजरी करण्यात आली. चंद्रपूरात ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंती निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार  अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here