कोविड- १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचना सह महा मेट्रो प्रशासन तयार

118

नागपूर २७, जून:* कोविड नंतर मेट्रो सेवा सुरु करण्यासंबंधी महा मेट्रो,प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाश्यांसाठी सर्व खबरदारी म्हणून महा मेट्रोच्या वतीने अनेक उपाय योजना योजिल्या आहे. मेट्रो प्रवाश्यांच्या सुरक्षित प्रवास या उदेशाने महा मेट्रोच्या वतीने मेट्रो गाड्यांचे नियमित पणे निर्जंतुकीकरण करण्यात येईल तसेच मेट्रो स्थानकावर ज्याठिकाणी जास्ती रहदारी असते ते ठिकाण वारंवार स्वच्छ केली जातील. जसे कि, क्रू कंट्रोल रूम,बेबी केयर रूम आणि स्टेशन कंट्रोल रूम याठिकाणी मोठ्या प्रमाणात सतत गर्दी असते असे सर्व ठिकाण,खोल्या वारंवार स्वच्छ केल्या जाईल.  याव्यतिरिक्त मेट्रो कर्मचारी पीपीई कीट सह, मास्क आणि हँड ग्लोव्हज घालून कार्यरत असतील. तसेच केंद्र शासन आणि राज्य शासनाने कोविड-१९ महामारी करिता वेळोवेळी जारी केलेल्या दिशा निर्देशाचे पालन करण्यात येईल. शासनाने जारी केलेले निर्देश प्रवाश्यांना तसेच मेट्रो कर्मचाऱ्यांना नियमित सांगण्यात येईल. कोविड – १९ संबंधित जागरुकता नियमित पणे मेट्रो स्टेशन आणि मेट्रो ट्रेन मध्ये उपलब्ध असलेल्या स्पीकरद्वारे घोषणा केल्या जातील. तसेच मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाश्यांकरिता सूचना फलक लावण्यात येतील.  मेट्रो स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनां बाबत महा मेट्रोच्या  कर्मचाऱ्यांना जागरूक करण्यात आले असून मेट्रो प्रवाश्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या करण्यात आलेल्या उपाय योजना पाळण्यास सांगितले आहे. मेट्रो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री करून देण्यासाठी मेट्रो अधिकारी या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील.