कोविड बाधित रुग्ण आढल्याने भद्रावतीचा नवीन  बसस्टॉप परिसर सिल

0
82

 

भद्रावती

……………………………………………………………………..   मुंबईवरून आलेला २२ वर्षीय एक युवक आणि हरियाणा इथुन आलेली ५३ वर्षीय एक व्यक्ती या दोघांचेही स्वॅब नमुन्याचा अहवाल काल दि. २६ जून रोजी रात्रो  प्राप्त झाला. या अहवालात सदर दोन्ही जण पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे स्थानिक नवीन बसस्टॉप परिसर  सिल करण्यात आला. यावेळी तहसीलदार महेश शितोळे, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, पोलीस निरीक्षक सुनिल सिंग पवार, न .प. चे जलनिस्तारण अभियंता निलेश रासेकर आणि न.प. चे सॅनिटायझर इन्स्पेक्टर रविन्द्र गड्डमवार उपस्थित होते.

स्थानिक  गणपती वार्ड येथील २२ वर्षीय युवक आणि ५३ वर्षीय व्यक्तीला विलगीकरण कक्षात यापूर्वी ठेवण्यात आले होते. या दोघांनाही चंद्रपूरच्या सामान्य रुग्गणालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाकडून कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here