वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

125
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील  तोहोगाव वन विकास      महामंडळ च्या कक्ष क्रमांक 26 मध्ये काल येथील दिनकर ठेंगरे यांचा मृत्यूदेह आढळून आला.मृत्यू झालेल्या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा दिसून आल्याने वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे
   तोहोगाव हे गाव जंगलालगत असल्याने शेतकरी,वनमजूराचा या जंगलात वावर असतो हे बहुतांश जंगल मध्य चांदा वन विकास महामंडळ बल्लारशाह विभागीय कार्यालय अंतर्गत समाविष्ठ आहे दिनकर ठेंगरे हा शेतीचे कामासाठी बांबू आणायला काल दिनांक २७ जून रोजी जंगलात गेला परंतु  बराच वेळ होऊन सुध्धा घरी न परतल्याने घरच्या मंडळीने शोधाशोध सुरू केली.  जंगलात शोध घेतला असता वन प्रकल्प कार्यालय तोहोगाव उपक्षेत्र  कक्ष क्रमांक २६मध्ये त्याचा मृत्यूदेह आढळून आला. घटना स्थळावरून वाघाचे हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट दिसून आले या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण  निर्माण झाले असून सतत वाघाचे हल्ले सुरु असल्याने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकार्यानी केली आहे.