आजारी कामगाराला मदतीची गरज

0
125

आजारी कामगाराला मदतीची गरज

चंद्रपूर : येथील बालाजी वार्डातील निंबालकर वाडीत राहणाऱ्या आजारी कामगाराला मदत करण्याचे आवाहन वार्डातील नागरिकांनी केले आहे. बिहार राज्यातील अजित अर्जुन मंदर (३०) हे मागील काही वर्षांपासून चंद्रपुरात मजूरीची कामे करून कुटुंब चालवीत आहेत. त्यांना पत्नी व दोन मुले आहेत. एका कंत्राटदाराकडे बांधकाम करताना वरून पडल्याने पायाला जबर मार लागला. डॉक्टरकडे दाखल केल्यानंतर मोठे ऑपरेशन करण्याचे सुचविले. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. कागदपत्राअभावी महात्मा फुले विमा योजनेचा लाभही घेता येत नाही. सध्या मजुरी बंद असल्याने कुटुंबाचे हाल सुरू आहेत. त्यामुळे सेवाभावी संस्था व व्यक्तीनी अजीत अर्जुन मंदर रा. बालाजी वार्ड चंद्रपूर येथे मदत करण्याचे आवाहन वार्डातील नागरिकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here