सुगंधित तंबाखू विकणाऱ्या व्यापारांवर कार्यवाही करा

101

बल्लारपूर शहरात सर्रास पणे जे सुगंधित तंबाखू व तंबाखुजन्य विक्री करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी बल्लारपूर नगर पालिका काँग्रेस गटनेता सचिन जाधव यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे ,

त्यांनी आपल्या निवेदनात असे म्हंटले की, सुगंधित तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थावर राज्य शासनाने बंदी घातलेली असतांना सुद्धा बल्लारपूर शहरात काही व्यापाऱ्यांकडून खुलेआम पद्धतीने ही विक्री करण्यात येत आहे .सुगंधित तंबाखु मधील अल्कहोलाईट,रसायनात कोटींनाईल,ऑणोबेसिन,अशी रसायन असून भारतीय तंबाखु मध्ये मक्युरी,लेड, कोमीनाईल,आदी अतिविषारी रसायन सापडतात.सुगंधित तंबाखुमुळे, तोंड,फुफुस,गळा, अन्ननलिका, मूत्रपिंड, नाक मुखाचा कर्करोग होतो .
शासनाने तंबाखूच्या विरोधात अनेक कायदे केले असून त्याची अंमलबजावणी मात्र बल्लारपूर शहरात होतांना दिसत नाही,त्यामुळे व्यापाऱ्यांकडून कडून कायदा व सुवेवस्था धाब्यावर बसवलयाचे दिसत आहे.
आशा सर्व व्यापाऱ्यांच्या अवैध गोडाऊनवर छापे टाकून संपूर्ण माल जप्त करून सर्व व्यापाऱ्यांवर योग्यती कारवाही करण्यात यावी,
अन्यथा काँग्रेस व युवक काँग्रेस तीव्र आंदोलनाचा पवित्रा अजमावणार अशे प्रतिपादन बल्लारपूर नगर पालिकेचे काँग्रेसचे गट नेता सचिन जाधव यांनी केले