बल्लारपुरात तरुणाची आत्महत्या

125

बल्लारपुर : बल्लारपुर शहरातील टेकडी विभागात कन्नमवार वार्डातील रहीवाशी सुरज ठाकूर (३२) वर्षीय युवकाने आज दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास कन्नमवार वार्ड वासु कीराणा स्टोअर जवळील परीसरात असलेल्या आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे,

सुरज ठाकूर नामक युवक सीसीटीव्ही इंस्टॉलेशन चा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.तर त्याचे दोन मोठे भाऊ गुजरात व मध्यप्रदेशात वास्तव्यास आहे. सुरज ठाकूर यांच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप स्पष्ठ होऊ शकलेले नाही.सदर घटनेचा तपास बल्लारपुर पोलीस करत आहे.