राष्ट्रमाता विद्यायात सेवानिवृत्त सत्कार सोहळा

122

पोंभुरणा *प्रतिनिधी*
राष्ट्रमाता विद्यालय तथा क.महाविद्यालय देवाडाखुर्द येथे आज दिनांक 30 जुन ला शाळेतील पर्यवेक्षक डि.डि.धोडरे हे वयाची ५८ वर्षे पुर्ण करुन सेवानिवृत्त झाले.त्याबद्दल त्यांच्या सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.आर.नागुलवार अध्यक्ष राष्ट्रमाता ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ देवाडाखुर्द , तर प्रमुख अतिथी श.स.टिकले सचिव राष्ट्रमाता ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळ देवाडाखुर्द तसेच सत्कारमुर्ती पर्यवेक्षक डि.डि.धोडरे आणि सौ.छाया धोडरे आणि सर्व संचालक मंडळ ऊपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन तथा सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन करण्यात आली. यावेळी प्राचार्य आर.पि.बुरांडे ,प्रा.विजय लोणबले ,सुनिल शेरकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंचावरील मान्यवरानी सेवानिवृत्त डि.डि.धोडरे यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.त्यांचे ऊर्वरीत आयुष्य सुख ,समाधान आणि आनंदाचे जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.
मान्यवरांचा हस्ते डि.डि.धोडरे यांचा सपत्नीक शाल ,श्रीफळ आणि भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला ऊत्तर देतांना डि.डि.धोडरे यांनी मि संस्थेचा अत्यंत ऋणी आहे.संंस्थेणी तसेच सहकार्यांनी मला प्रेम ,आपुलकी व स्नेहाची वागणूक दिली. या ऋणामधुन ऊतराई होणे शक्य नाही असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन दिलीप मॕकलवार ,प्रास्तविक मिलींद धोडरे तर आभारप्रदर्शन संदिप बद्दलवार यांनी केले.
कार्यक्रमाला प्राध्यापक ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी ऊपस्थित होते.