शरद पवार विचार मंच चंद्रपूर  तर्फे महावितरण मुख्य अभियंता यांना निवेदन

0
79
चंद्रपूर (काप्र)
 कोरिना मुळे संपूर्ण जग ग्रस्त असून, आपला भारत देश सुध्दा त्याला अपवाद नाही. त्यामुळे मा. पंतप्रधानांनी 24 मार्च पासून देशात lockdown घोषित केले. मागील 3 महिने लोकांना घराबाहेर पडता आले नाही. असंख्य लोकांचे रोजगार हिरावले,  खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे -व्यापार उध्वस्त झाले,लोकांना जीवन जगणे कठीण असतांना, मागील 3 महिन्यात कोरणामुळे, मीटर रीडिंग करता आली नाही, त्यामुळे अनेक लोकांना अंदाजे वीजबिल वारेमाप पाठविण्यात आले असून , त्यात स्थिर आकार कर , वीज शुल्क, वहन कर  यात  वाढ करून(1 एप्रिल 2020 पासून दर वाढले)वीजबिल पाठविले आहे, त्यामुळे जनतेत आक्रोश निर्माण झालेला असून त्याचे विपरीत परिणाम  घडू शकतात. लावलेल्या  वाढीव करामुळे वीजबिल वाढलेले असल्याने,  लावलेलेव वाढीव वीजकर  परत घ्यावे  अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर, संजय तुरीले, विजय बोढणे, मंगेश बोकडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here