वृत्तपत्र विक्रेत्यांना तातडीने मदत करा : बालाजी पवार

0
113

नांदेड

युनायटेड_फोरम_आॅफ_न्युजपेपर व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्यामध्ये एप्रिल महिन्यात बैठक झाली कोरोना बाधित वृत्तपत्र विक्रेत्यास ताबडतोब उपचारादरम्यान घर चालवण्यासाठी 15 हजार व कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या परिवाराला 3 लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल असे ठरले होते. पण गेल्या तीन महिन्यांत कोरोना बाधित व मृत झालेल्या परिवाराला आजपर्यंत ठरलेली मदत मिळाली नाही ती लवकरात लवकर मिळावी यासाठी काल बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने फोरमला पत्र दिले आहे.

#प्रेस_फोरम व #मुंबईतील_व्यवस्थापनांनी ताबडतोब दखल घ्यावी!
कारण मी सुद्धा काल राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस आदरणीय हरिश्चंद्र पवार यांचेशी मुंबईतील सांताक्रूझचे अध्यक्ष वृत्तपत्र विक्रेते सिध्देश‌ चव्हाण यांनी पत्र पाठवून उपस्थित केलेल्या प्रश्नाविषयी बोललो तर आजपर्यंत कोरोनामुळे निधन झालेल्यांना व बाधितांना ठरल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. तेंव्हा आदरणीय सुभाष देसाई साहेब यांच्यासह प्रेस फोरम व संबंधित व्यवस्थापनांनी या सर्व घटनांची दखल घेऊन ठरल्याप्रमाणे आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अशी मागणी बालाजी पवार
सरचिटणीस,महाराष्ट्र_राज्य_वृत्तपत्र_विक्रेता_संघटना यांनी केली आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here