कोरोना बाधित क्षेत्रातून येणाऱ्या व मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करा

0
91

सावली तालुक्यात बाधित क्षेत्रातून येणाऱ्या व मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा- प्रहार संघटना

*सावली* –

सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता समस्त देश हा कोरोना महामारीच्या विळख्यात सापडला असून कोरोना विषाणूच्या जीवघेण्या चक्राच्या पाशातून महाराष्ट्र राज्य सुद्धा अलिप्त राहू शकले नाही. त्यामुळे राज्यांच्या अनेक जिह्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण अतिशय विध्वंसक आणि भक्कम असून या महामारी पुढे राज्यातील जिल्हे सुद्धा हतबल झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात शासकीय कर्मचारी काम करत असतांना राज्यशासनाच्या आदेशान्वये तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये, संबंधित तालुक्यातील ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्या आदेशाची अवहेलना करून मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या तसेच इतरत्र ठिकाणाहून ये -जा चालू आहे .
जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी,मुल,नागभीड,चंद्रपूर या ठिकाणी कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले असून दिवसेंदिवस त्याची संख्या झपाट्याने वाढत आहे.परंतु सावली तालुका मात्र यापासून अलिप्त असून तालुका कोरोना मुक्त आहे. तालुक्यालगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातुन तसेच वरील ठिकाणाहून अनेक शासकीय कर्मचारी तालुक्यात तसेच ग्रामीण भागात दररोज ये- जा करीत असून त्याच्या संपर्काने सावली तालुक्यात तसेच ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही .
मा. जिल्ह्याधिकारी साहेब यांनी कर्मचारी मुख्यालयी राहण्याबाबतचे आदेश जारी केले असता आदेशाची अवहेलना झाल्यास साथरोग प्रतिबंधित कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याचे संकेत दिले असतांना सुद्धा शासकीय कर्मचारी तालुका तसेच ग्रामीण भागातील मुख्यालयी न राहता सर्हासपणे गडचिरोली , मूल, चंद्रपूर,नागभीड,ब्रम्हपुरी येथून ये -जा करीत असून प्रशासन याकडे मात्र बघ्यांची भूमिका वठवत आहे. त्यामुळे प्रहार सेवक सावली
यांनी संयुक्तरित्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तालुक्यात तसेच ग्रामीण मुख्यालयी न राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधित कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणीचे निवेदन तहसीलदार सावली मार्फत जिल्हाधिकारी साहेबांना केली आहे .
यावेळी प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार सावली, प्रहार सेवक प्रफुल तुम्मे , प्रहार सेवक अमर उडिरवाडे प्रहार सेवक मिथुन मेश्राम , आदि, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here