युनुसभाई शेख यांचा “उत्कृष्ठ रुग्ण सेवक” आणि “कोव्हीड-19 योद्धा” म्हणून गौरव

0
91

सिंदेवाहि 

येथील युनुसभाई शेख यांचा ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि च्या वतीने “उत्कृष्ठ रुग्ण सेवक” आणि “कोव्हीड-19 योद्धा” म्हणून प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आले आहे.युनुसभाई शेख हे वर्ष 2011 पासून सातत्याने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि येथील रुग्नकल्याण समिति मध्ये कार्यरत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाथ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि हे उत्कृष्ठ सेवेत प्रगतिपथावर आहेच त्याला जोड़ म्हणून वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. झाड़े सर अगदी शांत आणि संयमी स्वभावाने आपले कर्तव्य पार पाडित आहेत, त्याच प्रमाणे वर्तमान परिस्थित कोव्हीड प्रादुर्भाव असल्याने कोव्हीड प्रमुख म्हणून डॉ. कुमरे याचे कड़े जबाबदारी सोपविली आहे. ते सुद्धा ही जबाबदारी अतिशय काळजीने आपल्या कर्तव्याचे पालन करित आहेत सोबतिला डॉ, मसराम नव्याने रुजू झाले असून ते सुद्धा आपल्या कर्तव्यात तत्पर आहेत तसेच आयुष विभाग हे डॉ. कुलसंगे यांचे कड़े असून खूप वर्षापासून ते सुद्धा ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि येथे रुगनांच्या सेवेत कार्यरत असून आपली जबाबदारी सांभालत आहेत या सोबतच डॉ. जाधव सर नेत्र विशेषज्ञ आणि डॉ. लाकडे या सुद्धा महिला विशेषज्ञ म्हणून सेवा देत आहेत. तसेच डॉ. नितिन भैसारे हे सुद्धा 108 या रुग्नवाहिकेवर सदैव सेवेत असतात. युनुसभाई शेख यानी 2011 ते आजवरच्या सेवेत रुग्नकल्याण समिति मध्ये कार्य करताना अनेक वैद्यकीय अधिकारयांशी त्यांचा संपर्क आला प्रत्येकासोबत त्यानी सातत्याने जुळवून घेण्याचे आणि रुगनांना योग्य सेवा कशी देता येईल या करिता सहकार्य पर भूमिका दाखवूनच आपली भूमिका पार पाडन्याचा प्रयत्न केला आहे. वेळ-प्रसंगी काही वेळेस त्यांचे कडून काही वैद्यकीय अधिकारिंचे मन दुखावले सुद्धा आहेतच. परंतु तदनंतर लगेच डॉक्टर हाच समाजातील दिन-दुबल्याचा मुख्य सेवाकरी याचा सुद्धा प्रत्यक्ष अनुभव त्याना येत गेला आहे आणि त्यातूनच ते परिपक्व होत आहेत. उत्कृष्ठ असा कार्यालयीन स्टाप ज्या मध्ये काले बाबूजी मित्र आणि मार्गदर्शक म्हणून नेहमी सहकार्य करित असतात तसेच शालू मेश्राम मैडम यांचे सुद्धा विभागाशी संबंधित सहकार्य युनुसभाइना लाभत राहते, ,नर्सिंग स्टाप, ब्रदर स्टाप, औषधि सप्लायर, सफाई कर्मचारी, इत्यादि ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि येथील कर्तव्यात रुजू असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांचेशी मितभाषी संबंध कायम ठेवन्याचा सातत्याने प्रयत्न करित राहतात.*

*रुगनांच्या सेवेच्या बाबतीत आज सिंदेवाहितच नाही तर संपूर्ण तालुक्यात युनुसभाई यांचे नाव रुग्नाकारिता तलमलिने धावून येणारा व्यक्ति , रुग्नसेवक म्हणून युनुसभाईची ख्यातिप्राप्त आहे रुग्न रेफर असो की सोबत जाने असो, वेळ प्रसंगी त्याला व्यक्तिक स्तरावर मदत असो, रात्रो-बेरात्रो ही व्यक्ति रुगनांच्या सेवेत हाजर असतेच. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर, गडचिरोली, तसेच सावंगी, सेवाग्राम येथील इस्पीतळ सुद्धा घेतात. आज उशिरा का होईना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि यानी “उत्कृष्ठ रुग्न सेवक” आणि कोव्हीड सन्मान योद्धा म्हणून त्यांचा त्याचा गौरव केला आहे हे नक्कीच सिंदेवाहि शहराकरिता गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे.. तेव्हा जिल्हा आरोग्य विभाग , आणि जिल्हा प्रशासनाने तसेच शासनाने सुद्धा त्यांच्या या कार्याची दखल घ्यावी अशी सर्व-सामान्य समाजाची इच्छा आहे. प्रसंगी आज त्यांच्या या उत्कृष्ठ सेवाकार्याची दखल ग्रामीण रुग्णालय सिंदेवाहि यानी घेवून आज वैद्यकीय अधिकारी डॉ. झाड़े साहेब यानी त्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र देवून गौरव केला आहे. प्रसंगी वरिष्ठ लिपिक काले साहेब आणि अन्य सहकारी कर्मचारी उपस्थित होते.. सर्वानि त्यांचे प्रसंगी अभिनंदन करुण सहकार्य कायम ठेवून रुग्णाची सेवा करू हा संकल्प घेतला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here