पोलीस खात्यातील एका कुटुंबातील तीन जन कोरोना संक्रमित

0
94

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात आज ५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे या आधी पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन जवानांसह १२८ झालेली  संख्या आज १३३ वर पोहोचली आहे. काल मंगळवारला चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नव्हता. जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने दिलेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर वरून आलेल्या पोलीस ३२ वर्षीय जवानाचा ६ तारखेला स्वॅब घेण्यात आला होता. ८ तारखेला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे आतापर्यत राज्य राखीव पोलीस दलाच्या चवथ्या जवानाला कोरोनाची चंद्रपूरमध्ये लागन झाली आहे. ऊर्जानगर मधील या पुर्वी आढळलेल्या एका  बाधितांच्या संपर्कातील एकूण तीन जण पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये बाधितांची ६० वर्षीय आई व सात वर्षीय नात यांच्यासोबतच सोबत या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीचा देखील समावेश आहे. आजच्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये वरोरा तालुक्यातील मोहबाळा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नागपूर येथून आल्यानंतर ही व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात न राहता एक दिवसासाठी घरी गेला होता. नंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांचा स्वॅब घेतला असता ते पॉझिटिव्ह आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here