२८ वर्षीय ययुवकाने अल्पवयीन मुलीवर ४ वर्षापासून शारिरीक शोषण करून केले गर्भवती

0
78

चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात राहणाऱ्या निलेश पिंपळकर या २८ वर्षीय व्यक्तीने एका अल्पवयीन असलेल्या मुलीवर ४ वर्षापासून शारिरीक शोषण करून दोनदा गर्भवती बनविले अशातच मुलगी एकवीस वर्षाची झाल्याने मुलीने मुलाकडे लग्नाची इच्छा प्रगट केल्यानंतर मी तुझ्याच सोबत लग्न करतो पण काही दिवस थांब असे म्हटले होते, त्यामुळे मुलीने काही दिवस वाट बघितली पण निलेश याचे पुनः एका मुलीसोबत प्रेम सबंध असल्याचे माहीत झाल्यावर तिने निलेशला विचारले की तू मी असताना दुसऱ्या मुलीसोबत कसे काय प्रेम केले? तर त्यावर निलेशने मी भटकलो होतो असे सांगितले व त्या दिवशी लग्न करण्यास तयार झाला पण दुसऱ्या दिवशीच तो घरून गायब झाल्याने मुलगी त्याच्या घरी त्याच्या दुसऱ्या वडील असणाऱ्या रोटी बैंक च्या राजू चौरीया यांना भेटली तर त्यांनी मी तुझ्या घरी येतो नंतर चर्चा करू असे सांगितले.मात्र राजू चौरिया मुलीच्या घरी आला नसल्याने व मुलीला अश्लील शिवीगाळ केल्याने व ठार मारण्याची धमकी दिल्याने दुसऱ्या दिवशी मुलीने रामाळा तलावात उडी घेतली दरम्यान तलावात पाणी कमी असल्याने मुलीचा जीव वाचला नंतर मुलीने दिनांक १८ जून ला शहर पोलिस स्टेशन मधे तक्रार दिली होती.

शहर पोलिस स्टेशन मधे मुलीचे बयान घेवून केवळ कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करून राजू चौरिया यांच्या पुढाकारामुळे पोलिसांनी निलेश विरोधात ४ वर्षापासून शारिरीक सबंध अल्पवयीन मुलीसोबत असताना पॉस्को सह ३७६,३०६ अंतर्गत गुन्हे दाखल केले नाही व मुलाला अरेस्ट न करता त्याला अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत केली व मुलगी पोलिस स्टेशन मधे विचारायला गेली असताना पोलिस तिला हुसकावून लावत आहे त्यामुळे आरोपी विरोधात वरील गुन्हे दाखल करून न्याय द्यावा याकरिता पत्रकार परिषद घेवून आपली व्यथा मांडली. याप्रसंगी सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू, मीना जोहर उपस्थित होत्या …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here